ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अरविंद केजरीवाल यांनी आपली पत्नी सुनीता केजरीवाल यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर स्वतःला होम क्वारंटाइन केले आहे. त्यांची पत्नी देखील होम आयसोलेशनमध्ये आहे.
केजरीवाल यांनी मंगळवारी सकाळी ट्विट करत सांगितले की, दिल्लीत आजपासून लॉकडाऊन सुरू झाले आहे. हा निर्णय सर्वांचे आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. कृपया सर्वांनी यासाठी सरकारला सहकार्य करत आपापल्या घरीच रहावे आणि स्वतःचा बचाव करावा, असे देखील आवाहन केले आहे.
दरम्यान, दिल्लीत कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी 6 दिवसांचे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र, या घोषणेनंतर मजुरांनी रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर आपल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.