नवी दिल्ली
कापड उद्योगातील आघाडीवरची कंपनी अरविंद टेक्स्टाइल्सला पहिल्या तिमाहीत 97 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. एप्रिल ते जूनच्या कालावधीत हा तोटा कंपनीला झाला असून मागच्या वर्षी याच कालावधीत 24 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचा महसुलही कमी झाला असून तो 599 कोटी रुपयांवर घसरला आहे. मागच्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीने 1 हजार 896 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्रीत कमालीची घट झाली असल्याची बाब समोर आली आहे. देशातील ही सर्वात मोठी कापड उद्योगातील कंपनी असून एकूण महसूल 7 हजार 430 कोटी रुपये इतका आहे. जागतिक स्तरावर अनेक फॅशन ब्रँडसोबत कंपनी कार्य करते आहे.