ईटानगर
अरुणाचल प्रदेशच्या चांगलांगनजीक शुक्रवारी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. शुक्रवारी दुपारी 12.39 वाजता जाणवलेल्या भूकंपाचे केंद्र चांगलांग जिल्हय़ापासून 222 किलोमीटर अंतरावर होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार रिश्टर स्केलवर याची तीव्रता 4.2 इतकी होती. भूकंपाच्या या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही. अरुणाचलपूर्वी हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाचे केंद्र धर्मशाळेपासून 57 किलोमीटर अंतरावर होते. तीव्रता कमी असल्याने तेथेही हानी झाल्याचे वृत्त नाही.