ऋत्विक धनजानीसोबतचा लघूपट
एमएक्स प्लेयरची लोकप्रिय वेबसीरिज आश्रममध्ये बबिता ही भूमिका साकारून चर्चेत आलेली अभिनेत्री त्रिधा चौधरी आता एका विवाहाची तयारी करत असलेल्या युवतीच्या भूमिकेत दिसून येईल. तिची ही भूमिका लघू पट ‘अरेंज्ड’मध्ये दिसून येणार आहे. यात तिच्यासोबत प्रसिद्ध कलाकार ऋत्विक धनजानी काम करत आहे.
अरेंज्डचा प्रीमियर अमेझॉनच्या शॉपिंग ऍपवर असलेल्या मिनी-टीव्हीवर करण्यात आला आहे. याकरता कुठल्याही सब्सक्रिप्शनची गरज नाही. शॉपिंग ऍपवर जाऊन मिनी-टीव्ही सेक्शनमध्ये चित्रपट मोफत पाहता येतो. अरेंज्ड ही ऋचा (त्रिधा चौधरी) आणि तरुण (ऋत्विक धनजानी)ची कहाणी आहे. काही अडथळे आणि अनिश्चिततांदरम्यान स्वतःचा मार्ग शोधणाऱया तरुण जोडप्याच्या जीवनावर प्रकाश टाकणारी ही कहाणी आहे.
लघुपटाची निर्मिती टेरीबली टाइनी टेल्सने केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी रितेश मेननने सांभाळली आहे. त्रिधा आता ओटीटीवरील लोकप्रिय चेहरा आहे. आश्रमसह तिने दहलीज, बंदिश बँडिट्स यासारखे शो केले आहेत.