प्रतिनिधी/ बेळगाव
फ्रान्समधील एका मासिकामध्ये मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहेत. त्याचबरोबर व्यंगचित्र देखील काढण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण जगातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या असून सर्व अरेबियन देशांनी फ्रान्सशी असलेले संबंध तोडावे, अशा आशयाचे निवेदन सौदी अरेबियाच्या जनरल सेपेटरींच्या नावे जिल्हाधिकाऱयांकडे देण्यात आले.
इंडियन युनियन मुस्लीम लीग यांनी सदर निवेदन दिले आहे. जवळपास 57 मुस्लीम देश आहेत. त्या सर्वांनी एकजुटीने त्याला विरोध करणे गरजेचे आहे. इस्लाम धर्माचा आदर करण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलावे, असेही या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी इंडियन युनियन मुस्लीम लीगचे पदाधिकारी उपस्थित होते.
टिपु सुलतान संघर्ष समितीच्यावतीनेही निवेदन
मुहम्मद पैगंबर यांनी देशाला शांतीचा संदेश दिला आहे. अशा थोर व्यक्तीच्या विरोधात अपशब्द वापरणाऱयांवर कारवाई आणि तसेच ज्या व्यक्तीने व्यंगचित्र काढले आहे त्याच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी टिपु सुलतान संघर्ष समितीच्यावतीनेही करण्यात आली आहे. यावेळी आरीफ कटगेरी, फजलखान पठाण, इम्तियाज जमादार, शाहबाज पठाण, जाहीर अत्तार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते..