प्रतिनिधी /बेळगाव
सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्यावतीने तुर्केवाडी येथील शिक्षिका अर्चना गोविंद शिंदे यांना क्रांतीज्योती सावित्रीची लेक 2022 या पुरस्काराने गौरविण्यात आले. कोल्हापूर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चव्हाण, शिक्षण समिती सभापती रसिका पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.