बेळगाव : येथील कंग्राळ गल्लीतील रहिवासी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बेळगावातील निष्ठावंत कार्यकर्ते अर्जुनराव गौंडाडकर (वय 85) यांचे रविवार दि. 9 रोजी अल्पशा आजाराने
निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
राष्ट्रमाता जिजाबाई यांच्याविषयी त्यांनी व्याख्याने दिली होती. तसेच जिजाबाई जयंती बेळगावात साजरी करत असत. धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. बोगारवेसला धर्मवीर संभाजी चौक म्हणण्यात यावे, असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा. त्यांनी काही वर्षे वृत्तपत्रात काम केले होते. त्यांचा मराठी शुद्ध लेखनावर कटाक्ष होता.