बीपीएल मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित सहाव्या बेळगाव प्रिमियर लीग मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून अर्जुनवीर, श्री साई सोशल संघाने स्पोर्ट्स ऑन संघाचा 8 धावांनी तर विश्रुत स्ट्रायकर्सने सुपर एक्स्प्रेस युनियन संघाचा 5 गडय़ाने पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. सुजय सातेरी (अर्जुनवीर), रोहन जवळी (विश्रुत) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात स्पोर्ट्स ऑन संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 184 धावा केल्या. त्यात दर्शन पाटीलने 12 चौकारासह 36 चेंडूत 61, उत्तम दत्ताने 1 षटकार 5 चौकारासह 47, आकाश कटांबळेने 4 षटकार 1 चौकारासह 18 चेंडूत 39 तर तेजस पवारने 4 चौकारासह 18 धावा केल्या. अर्जुनवीरतर्फे वैभव कुरीबागीने 25 धावात 3 तर अलगौडा पाटील, सोमेश्वर, नवलीमठ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुनवीर श्री साई सोशल संघाने 17.4 षटकात 2 गडी बाद 186 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. त्यात सुजय सातेरीने 4 षटकार 12 चौकारासह 48 चेंडूत 96 तर सुदीप सातेरीने 2 षटकार 8 चौकारासह 39 चेंडूत 63 तर वैभव कुरीबागीने 4 चौकारासह 21 धावा केल्या. स्पोर्ट्स ऑनतर्फे दीपक नार्वेकर व आकाश पत्तार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना संघाने 20 षटकात 9 गडी बाद 134 धावा केल्या. त्यात शिवप्रकाश हिरेमठने 2 षटकार 1 चौकारासह 23, रोहित पाटीलने 2 चौकारासह 22 तर दीपक राक्षेने 1 षटकार 1 चौकारासह 21 धावा केल्या. विश्रुततर्फे मदन बेळगावकरने 18 धावात 2, तर अंगदराज हित्तलमनीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विश्रुत स्ट्रायकर्सने 18.1 षटकात 5 गडी बाद 135 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. त्यात रोशन जवळीने 1 षटकार 7 चौकारासह 53, अंगदराज हित्तलमनीने 23 तर राहुल नाईकने 16 धावा केल्या. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अनिल पेडणेकर, सचिन पेडणेकर, बळू उच्चूकर, प्रमोद बोकडे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामनावीर सुजय सातेरी, इम्पॅक्ट खेळाडू सुदीप सातेरी, सर्वाधिक षटकार आकाश कटांबळे, उत्कृ÷ झेल अनिल गौडा पाटील, यांना चषक देवून तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे सिद्धार्थ भंडारी, संजय मोरे यांच्या हस्ते सामनावीर रोशन जवळी, इम्पॅक्ट खेळाडू अंगदराज हित्तलमनी, सर्वाधिक षटकार शिवप्रकाश हिरेमठ, उत्कृ÷ झेल राहुल नाईक यांना चषक देवून गौरविण्यात आले.
रविवारचे सामने के. आर. शेट्टी किंग्स वि. विश्रुत स्ट्रायकर्स सकाळी 9 वा., स्पोर्ट्स ऑन वि. मोहन मोरे दु. 1 वा.