नाशिक येथे डीवायएसपी खडतर प्रशिक्षण पूर्ण
औंध / प्रतिनिधी
बीड जिल्ह्याचा सुपूत्र आणि जागतिक पदक विजेता अर्जूनवीर राहुल आवारे यांनी नाशिक पोलीस प्रशिक्षण अकादमीत उपविभागीय पोलीस अधिकारी डीवायएसपी पदाचे खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून पुणे जिल्हा ग्रामीणची सुत्रे हाती घेतली.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून कुस्ती क्षेत्रात आलेल्या राहुलने रुस्तुम- ए- हिंद हरिश्चंद्र बिराजदार आणि अर्जूनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अथकपणे परिश्रम घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी राष्ट्रकुल, काँमनवेल्थ, एशियन चँम्पियनशिप, जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकून राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकावला होता. त्यांच्या दिमाखदार कामगिरीची दाखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्याची डीवायएसपी पदावर नियुक्ती केली होती.
नियुक्तीनंतर राहुलने नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. ग्रुह विभागाने पुणे जिल्हा ग्रामीणला प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती केली आहे. पदभार सांभाळणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी करणारे राहुल आवारे पोलीस खात्यात देखील आपल्या कामाचा ठसा उमटवतील असा विश्वास कुस्ती शौकिनांना आहे.