वृत्तसंस्था/ माँटेव्हिडिओ
2022 च्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेसाठी सुरू असलेल्या पात्र फेरी स्पर्धेतील गुरुवारी येथे झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने व्हेनेझुएलाचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. मात्र, या सामन्यात अर्जेंटिना संघातील हुकूमी फुटबॉलपटू मेस्सीला सूर मिळू शकला नाही.
या सामन्यात व्हेनेझुएला संघाला दहा खेळाडूनिशी खेळ करावा लागला. व्हेनेझुएलाच्या मार्टिनेझला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले. सामन्याच्या पूर्वार्धात मार्टिनेझने अर्जेंटिनाचे खाते उघडले. अर्जेंटिनातर्फे शेवटच्या पंधरा मिनिटात बदली खेळाडू ज्योक्वीन कोरिया आणि अँजेल कोरिया यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवित आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. व्हेनेझुएलातर्फे एकमेव गोल सॉटेलिडोने केला. या सामन्यात अर्जेंटिनाला 3 गुण मिळाले. आता रविवारी अर्जेंटिनाचा सामना ब्राझिलबरोबर साओपावलो येथे येत्या रविवारी होणार आहे.