ऑनलाईन टीम / ब्यूनस आयर्स :
अर्जेंटिनात कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा गाठला आहे. अर्जेंटिनात आतापर्यंत 10 लाख 02 हजार 662 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 8 लाख 03 हजार 965 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
अर्जेंटिनात सोमवारी 12 हजार 982 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 449 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या तिथे 1 लाख 71 हजार 981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 4 हजार 392 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 26 हजार 716 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अर्जेंटिनाचा जगात सहावा क्रमांक लागतो. आतापर्यंत तिथे 26 लाख 26 हजार 406 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या, भारत दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 84 लाख 56 हजार 653 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. भारतात 75 लाख 94 हजार 736 तर ब्राझीलमध्ये ही संख्या 52 लाख 51 हजार 727 एवढी आहे