ऑनलाईन टीम / ब्यूनस आयर्स :
अर्जेंटिनात आतापर्यंत 12 लाख 84 हजार 519 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 11 लाख 180 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मागील 24 तासात अर्जेंटिनात 11 हजार 163 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 251 रुग्णांचा मृत्यू झाला. 12.84 लाख रुग्णसंख्येपैकी सध्या 1 लाख 49 हजार 557 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 34 हजार 781 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
कोरोना रुग्णसंख्येच्या आकडेवारीत अर्जेंटिनाचा जगात आठवा क्रमांक लागतो. अर्जेंटिनात 33 लाख 77 हजार 749 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.