वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेल्जियमची माजी टॉप सिडेड 38 वर्षीय टीम क्लिस्टर्सचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
गुरुवारी खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात कॅटरीना सिनियाकोव्हाने क्लिस्टर्सचा 6-1, 2-6, 6-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात झेकच्या सिनियाकोव्हाने बेसलाईन खेळावर अधिक भर दिला होता. 2012 साली टेनिसमधून निवृत्त झाल्यानंतर बेल्जियमच्या क्लिस्टर्सने या क्षेत्रात पाचवेळा पुनरागमन केले. पण यावेळचे पुनरागमन निराशाजनक ठरले. सिनियाकोव्हाचा पुढील फेरीतील सामना केर्बरशी होणार आहे.