पाच पालिकांची निवडणूक : अर्जसंख्या पोहोचली 437 वर,ग्रामपंचायतींसाठी आठ अर्ज
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील पाच पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज गुरुवारी शेवटचा दिवस आहे. काल बुधवारी सहाव्या दिवशी 113 अर्ज दाखल झाले असून एकूण अर्जसंख्या 437 वर पोहोचली आहे. दोन ग्रामपंचायतींच्या एकेका प्रभागात होणाऱया पोटनिवडणुकीसाठी दोन दिवसात प्रत्येकी चार मिळून आठ अर्ज दाखल झाले आहेत.
मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे व केपे पाच पालिकांची निवडणूक व सर्वण कारापूर आणि वेळ्ळी या ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक दि. 23 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज दि. 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
मुरगावात सर्वाधिक 130 अर्ज
दि. 31 रोजी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 10 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. दि. 1 एप्रिल रोजी 26 जणांनी अर्ज दाखल केले. दि. 3 रोजी 22, दि. 5 रोजी 129, दि. 6 रोजी 137 आणि काल दि. 7 रोजी 113 जणांनी अर्ज दाखल केले. त्याद्वारे अर्जांची संख्या 437 एवढी झाली अ्नहे. पालिकावार अर्जसंख्या म्हापसा 94, मडगाव 101, मुरगाव 130, केपे 68 व सांगे 44 अशी आहे.
दरम्यान, सर्वण कारापूर आणि वेळ्ळी या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी प्रत्येकी 2 अर्ज दाखल झाले असून दोन दिवसात एकूण अर्जसंख्या 8 झाली आहे.