उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी मोठय़ा राजकीय घडामोडी सुरू आहेत. पहिल्या टप्प्याचा प्रचार शमण्यापूर्वी अर्ज दाखल करणारे नेते पक्षांतर करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. मंगळवारी अशाच एका समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जगदीशपूर मतदारसंघातील सप उमेदवार रचना कोरी यांनी स्वतःचा अर्ज भरल्यावर भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
भाजप नेते लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी रचना यांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामांने अत्यंत प्रभावित असल्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये महिलांना सन्मान मिळतोय असे रचना यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी बहराइच जिल्हय़ातील मटेरा मतदारसंघातील सप उमेदवार हाजी मोहम्मद रमजान यांनी स्वतःची उमेदवारी नाकारली होती. मागील 10 वर्षांपासून श्रावस्ती मतदारसंघात काम करत राहिला आहे. परंतु मला मटेरा येथील तिकीट देण्यात आले. मटेरा मतदारसंघ माझ्यासाठी नवा असल्याने तेथून मोजक्या दिवसांमध्ये तयारी कशी करणार असे त्यांनी म्हटले आहे.