बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी बोईंग इंडिया आणि कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल), बेंगळूरमधील येळहंका कॅम्पसमध्ये सेल्को फाऊंडेशनच्या अर्थसहाय्य असलेल्या १०० ऑक्सिजनयुक्त बेड कोविड केअर सेंटरला भेट दिली.
राज्यात कोविड लसींच्या कमतरतेबाबत विचारले असता, सीतारमण म्हणाल्या की, कोरोनाची तीव्रता, लोकसंख्येची घनता आणि असुरक्षित लोकसंख्येच्या संख्येनुसार प्रत्येक राज्याला लसीचे वाटप होते.
“केंद्र सरकार आगाऊ लस पुरवठा करत आहे. तसेच लस देण्याआधी सात दिवस अगोदर किती लस दिली जाणार आहे हे जाहीर केले जाते. दरमहा ही प्रक्रिया सुरूच राहते,” तसेच सर्व राज्याची काळजी घेतली जाते. “लसीचे वाटप योग्य प्रकारे केले जाईल. सर्व लोकांच्या हिताची काळजी घेतली जाईल आणि सर्वांना लस दिली जाईल, अशी मी माध्यमांद्वारे खात्री देते” असे सीतारमण यांनी सांगितले.
नंतर त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांनी जयनगरमधील शासकीय जनरल हॉस्पिटलला भेट दिली आणि रुग्णालयातील लसीकरण केंद्रास भेट दिली. “३० जूनपर्यंत कर्नाटकातील १.९० कोटी लोकांना कोरोना लसीचा कमीतकमी एक डोस मिळाला आहे,” असे त्या म्हणाल्या.