प्रायव्हेट इक्विटी फर्म ब्लॅकस्टोनच्या यादीत माहिती सादर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशातील सध्याच्या आर्थिक संकटाची स्थिती बदलण्याची शक्यता लवकरच पहावयास मिळण्याचे संकेत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग 2020 मध्ये सुधारणार असून त्याची गती सहा टक्क्यांनी वाढणार असल्याचे अनुमान अमेरिकेची प्रायव्हेट इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन यांच्याकडून ‘टेन सरप्राइजेज फॉर 2020’ या r यादीत नोंदवले आहे. सदरच्या यादीत संभाव्य अर्थशास्त्राrय, आर्थिक आणि राजकीय घटनांचा समावेश केला आहे.
ब्लॅकस्टोनकडून सलग 35 व्या वर्षी ही यादी तयार केल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष बायरन वीन यांनी दिली आहे. आश्चर्यकारक आणि अन्य आर्थिक बदलासंदर्भातील घटनांची नोंद यात करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
चालू वर्षातील अन्य अंदाज
w 2020 मध्ये हाँगकाँगसह चीन आणि अमेरिकेतील वाद थांबण्याचे संकेत आहे.
w तेलाचे दर वाढण्यासोबत रशियाच्या आर्थिक समस्या वाढणार असून यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते.
w 2020 मध्ये जगात गोंधळ आणि सहकार्याची भावना कमी होणार आहे. त्यामुळे आर्थिक बाजारात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे.
w ट्रम्पकडून 2020 मध्ये उत्तर कोरिया आपला क्षेपणास्त्र प्रकल्प रद्द करण्याचे संकेत आहेत.