प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. हे अधिवेशन 24 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून 17 रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई अर्थसंकल्प मांडणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण करतील. 13 पासून चार दिवस राज्यपालांच्या भाषणावर चर्चा होईल. तर त्यानंतर 20 फेब्रुवारीपासून पाच दिवस अर्थसंकल्पावर सभागृहांमध्ये चर्चा होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेंगळूरमधील विधानसौधपासून 2 कि. मी. परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. या परिसरात आंदोलन, मोर्चे, सभांचे आयोजन करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. बेंगळूर शहर पोलीस आयुक्त प्रताप रेड्डी यांनी