ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात 1 फेबुवारीला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात येणार आहे.
सीसीपीएने 31 जानेवारी ते 11 फेबुवारी या कालावधीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा तर 14 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान दुसरा टप्पा घेण्याची शिफारस केली आहे.
देशात कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने हे अधिवेशन काळजी घेत घ्यावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे.