ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या अर्निया सेक्टरमध्ये मध्यरात्री अवकाशात लाल दिवा असलेले एक ऑब्जेक्ट दिसले. सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी या लाल दिव्यावर गोळीबार केला, तेव्हा हे ऑब्जेक्ट पाकिस्तानच्या दिशेने परतले. लाल दिवा असलेले हे ड्रोन होते की, अन्य काही याची खातरजमा अद्याप झालेली नाही. सुरक्षा दलाकडून या संपूर्ण परिसराचा शोध घेतला जात आहे.