गावातील अनेक मंदिरांत पूजा-अभिषेक-आरती : सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
अलतगा (ता. बेळगाव) येथील माळीभरम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडला. याचबरोबर गावातील बाळाबाई मंदिर, चव्हाटा, मोठीबाई, गौळदेव, गुंडीदेव, विठलाई, मरगाई देवी मंदिरात पूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. गावातून भंडाऱयाच्या उधळणीत फेरी काढण्यात आली. यावेळी शेकडो महिला डोकीवर कळस घेऊन सहभागी झाल्या होत्या.
यावेळी पुंडलिक कंग्राळकर, भरमा पाटील, चंद्राम चौगुले, विनोद चौगुले, सुरेश सुतार, रमेश कांबळे, बाळाजी चौगुले, यल्लाप्पा चिखलकर, संभाजी घुग्रेटकर, यल्लाप्पा भरमा चौगुले यांच्या हस्ते विविध मंदिरांचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कल्लाप्पा पावशे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष अर्कसाली, जोतिबा पाटील, गोपाळ चिकोर्डे, उत्तम अर्कसाली, शिवाजी मालाई, संतोष वानरसे, राजू जगजंपी, विजय कम्मार, महेश धामणेकर, विनोद शिंदे, संजय कल्लाप्पा पाटील, कल्लाप्पा आलोजी होते.
मान्यवरांकडून देवतांचे पूजन
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, प्रशांत, शिवशक्ती करिअर अकादमीचे पिंटू चिखलकर, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, ज्योतेश चौगुले, विजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. गणेश मंदिर गाभाऱयाचे पूजन संतोष अर्कसाली (सोनार) यांनी, जुन्या गणपती मंदिराचे पूजन प्रशांत पाटील, छत्रपती शिवाजी महाराज पुतळय़ाचे पूजन मलगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायततर्फे मंजूर झालेल्या कूपनलिकेचे पूजन ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहन आलोजी, सुरेश घुग्रेटकर, परशराम चिखलकर, मोहन आलोजी, गणपती सुतार, गिरीजा सुतार, सिद्राय दळवी, सोमनाथ आलोजी, पितांबर पाटील, सुरेश पाटील, बाळू चौगुले, उमेश चौगुले, तुकाराम चौगुले, पिंटू चौगुले, अनिल पावशे, दुर्गाराम पाटील, शैलेश पवार, पुंडलिक पाटील, सदाशिव पावशे, लक्ष्मण पावशे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक चंद्रकांत धुडूम यांनी केले. आभार ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे यांनी मानले.