कोरोनाचे नियम पाळून साजरी होते दौड
प्रतिनिधी/ बेळगाव
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, छत्रपती शिवाजी चौक आणि गणेश युवक मंडळ अलतगा यांच्यावतीने सालाबाद काढण्यात येणारी दौड यावषी साध्यापध्दतीने काढण्यात येत आहे. मात्र दौडीत उत्साह आणि चैतान्यमय वातावरण निर्माण होत असून शिवभक्त यामध्ये सहभागी होत आहेत. प्रारंभी छत्रपती शिवाजी चौक येथून दौडीला सुरुवात होते. त्यानंतर संपूर्ण गावात ही दौड फिरते.
गावात विविध रस्त्यांवर रांगोळय़ा व इतर सजावटीचे साहित्य ठेवून दौडीचे स्वागत करण्यात येते. यावषी कोरोनामुळे ही दौड साध्यापध्दतीने होत असली तरी उत्साह व्दिगुणीत करणारी ही दौड चैतन्यमय वातावरण निघत आहे. पहाटेपासूनच या दौडीचे नियोजन करण्यात येत आहे. गावातील विविध मंदिरांमध्ये ही दौड जात असून दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजाचे पूजन करण्यात येत आहे.
गावातील रमेश बाळू पवार, भरमा आलोजी, माजी ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, पुंडलीक पाटील, बाळू पाटील, किरन चौगुले, कृष्णा सुतार, संजय बेळगाव, गणेश जाधव, आनंद जाधव, श्रीकांत पाटील, भाऊ जाधव, आप्पाजी पाटील, राम आलोजी, राजू शहापूरकर, शैलेश पवार यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवभक्त दौडीत सहभागी होत आहेत.