अनेकांच्या शंका-कुशंकांचे निरसन : गावात एटीएम बसविण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
अलतगा (ता. बेळगाव) येथे बँक ऑफ इंडिया शाखा एपीएमसीच्यावतीने बँक व्यवहारांबाबत जागृती मेळावा भरविण्यात आला होता. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी बँकांतूनच व्यवहार करून बँकांच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँक व्यवस्थापनाने केले. याचबरोबर बँकांचा कारभार कशा प्रकारे चालतो याची माहितीही दिली.
ब्रम्हलिंगेश्वर दूध डेअरी संस्थापक चेअरमन कल्लाप्पा पावशे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. सरस्वती फोटो पूजन बँक व्यवस्थापक रंजना मीना व ग्राम पंचायत सदस्या गिरीजा सुतार यांनी केले. दीपप्रज्वलन प्रमुख वक्ते टी. डी. पाटील, देवस्थान पंच कमिटी उपाध्यक्ष संजय पाटील, पीडीओ आर. एम. फगरे यांच्या हस्ते झाले.
श्रीफळ सुब्राव चौगुले यांनी वाढविले. उपस्थित मानवरांना पुष्पहार व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचा उद्देश सांगितला. बँक प्रातिनिधी रंजना मीना, प्रमुख वक्ते टी. डी. पाटील व पीडीओ फगरे यांनी मागदर्शन करताना बँक ऑफ इंडियाचे तुम्ही खातेदार व्हा व अतिशय अल्प व्याजदरात सुवर्ण कर्ज, गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, जिरायती व बागायती पिकांना अल्प व्याजदरात एकरी 20 ते 40 हजारापर्यंत कर्ज, जीवन सुरक्षा बीमा, जीवन ज्योती सुरक्षा, अटल पेन्शन योजना, स्व-साहाय्य संघांना विविध व्यवसायांसाठी कोणत्याही तारणाशिवाय कर्जपुरवठा यासारख्या सुविधांची माहिती दिली. यासाठी लागणाऱया कागदपत्रांबाबतही स्पस्टीकरण सांगितले.
उपस्थित नागरिकांनी एटीएम कार्ड, खाते ट्रान्स्फर, चेक वेळेत वठणे याबाबत शंका विचारून अलतगा गावात बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन बसविण्याची मागणी केली. अध्यक्ष पावशे यांनी बँक कर्मचाऱयांना गावात येऊन मार्गदर्शन केलेबद्दल धन्यवाद देऊन लोकांनी बँकांच्या सुविधांचा उपयोग करून घेऊन आर्थिक स्थिती सुधारा, असे आवाहन केले.
यावेळी बाळू चौगुले, पुंडलिक पाटील, आनंद चौगुले, अशोक घुग्रेटकर, सिद्राय कणबरकर, कल्लाप्पा चांगुले, निंगाप्पा आलोजी, पप्पू घुग्रेटकर, जोतिबा, सुमन पाटील, पूजा चौगुले, सुमन दळवी, उज्ज्वला पाटील, वंदना आलोजी, मालू घुग्रेटकर, यल्लाप्पा पाटील, विनायक मोरे, विजय पाटील, अभिषेक घोडेतगुड्डा, दोड्डबागी रेड्डी यांच्यासह गावातील शेकडो स्त्री-पुरुष उपस्थित होते. कार्यकमाचे सूत्रसंचालन देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडूम यांनी करून आभार मानले.