कोयना, महाबळेश्वर परिसरात पाऊस किंचीत मंदावला
प्रतिनिधी / सांगली
अलमट्टी धरणाचा विसर्ग अडीच लाख क्युसेस करण्यात आला आहे. सकाळी दहापासून तो दोन लाख क्युसेस होता. महाराष्ट्र शासनाने तो वाढवा अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर दुपारी विसर्ग वाढवून अडीच लाख करण्यात आला आहे. दरम्यान कालच्या तुलनेने कोयना, महाबळेश्वर परिसरात पाऊस थोडा मंदावला आहे.