ऑनलाईन टीम / बीजिंग :
ई-कॉमर्स क्षेत्रातील जॅक मा यांच्या ‘अलिबाबा’ या उद्योगसमूहाला चीनमधील नियामक यंत्रणेने मोठा दणका देत तब्बल 18.2 अब्ज युआन म्हणजेच (2.8 अब्ज डॉलरचा) दंड ठोठावला आहे.
अलिबाबाने आपल्या व्यापारपेठेवरील प्रभावाचा गैरफायदा घेत व्यापाऱ्यांना त्यांच्या बाजूने करून घेतले. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांच्या हक्कांचा भंग झाल्याचा ठपका नियामक यंत्रणेने ठेवला होता. मागील वर्षी ख्रिसमसच्या काळामध्ये यासंदर्भात चौकशीला सुरुवात झाली होती. ती चौकशी शनिवारी पूर्ण झाली.
अलिबाबाला ठोठावण्यात आलेला दंड खूपच मोठा आहे. तरी देखील अलिबाबाने या दंडाचा स्वीकार केला असून, तो भरण्याची तयारी दर्शविली आहे.