ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. नोबेल पुरस्कार समितीने आज ही घोषणा केली.
या तिन्ही वैज्ञानिकांनी ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूचा शोध लावला. या शोधामुळे या विषाणूशी संबंधित आजारांसाठी संभाव्य रक्त चाचण्या करता येतात. तसेच त्या आजारांवरील औषधे तयार करता येतात. सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार बरे होऊ शकतात. या शोधाच्या कार्याबद्दल अल्टर, ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नोबेल हे वैद्यकशास्त्राव्यतिरिक्त शांतता, साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात दिले जाणारे जगातील सर्वोच्च पारितोषिक आहे.