प्रतिनिधी / कोल्हापूर
अल्पवयीन महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करुन तिला कोंडून ठेवल्याप्रकरणी करवीर पोलीसांनी तरुणास अटक केली. सौरभ अशोक जांभळे (वय 21 रा. बालिंगा ता. करवीर) असे अटक पेलेल्या तरुणाचे नांव आहे. त्याने संबंधीत तरुणीवर अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. याबाबतची फिर्याद करवीर पोलीस ठाण्यात तरुणीच्या नातेवाईकांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारावीच्या वर्गात शिकणाऱया एका तरुणीचे सौरभ जांभळे याने 28 ऑगस्ट रोजी राहत्या घराजवळून अपहरण केले. यानंतर पिडीत तरुणीच्या नातेवाईकांनी सौरभ जांभळे विरोधात करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानुसार पोलीसांनी जांभळे याच्या पुणे येथील घरावर छापा टाकून तरुणीसह अटक केली होती. यानंतर संबंधीत तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले. यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तपास करुन संबंधीत तरुणास अटक केली.