प्रतिनिधी/ फलटण
येथील अल्पवयीन मुलांनी 9 व 10 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधित दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबधी फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, फलटण येथील मंगळवार पेठेतील 16 व 17 वर्षाच्या अल्पवयीन दोन मुलांनी 9 व 10 वर्षाचा लहान मुलांना अश्लील व्हिडिओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याबाबत फलटण शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा 09/09/2020 रोजी पासून 3 डिसेंबरपर्यंत फिर्यादीचे घराशेजारील संडासवरील पायरीवर व विधीसंघर्षं ग्रस्त बालक याचे घरी कोणी नसताना घडला आहे. वरील दिलेल्या कालावधीत विधीसंघर्षग्रस्त बालक रा. आखरी रस्ता झिरपे गल्ली मंगळवार पेठ फलटण यांनी त्यांचे मोबाईलवरून पीडित मुलांना वेळोवेळी अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला तसेच अनैसर्गिक संभोग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पालकांनी अल्पवयीन मुलांना मोबाईल दिल्यानंतर मुले त्याचा कसा गैरवापर करतात यावरून दिसून आले आहे. यासंबधी फलटण शहर पोलीस ठाणे येथे भा द वि कलम 377,34 पोस्को 4,8,12 दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आखरी रस्ता झिरपे गल्ली मंगळवार पेठ फलटण येथील 28 वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे. पुढील तपास पो उ नि भंडारे हे करीत आहे.