प्रतिनिधी/ सातारा
शहरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलगी शौचालयाला जात असताना संशयितांनी तिची छेड काढत तिचा विनयभंग केला. व मुलीचे वडील, चुलते यांना मारहाण केली. म्हणून तीन संशयिताविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, अल्पवयीन मुलगी दि. 18 रोजी 5 वाजण्याच्या सुमारास शौचालयाला निघाली होती. यावेळी संशयित पप्पु संजय बनकर याने मुलीला डोळा मारला. लाल्या घाडगे याने मुलीला थांबण्यास सांगून ती थांबली नाही. म्हणून लाल्याने तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. मुलीसोबत घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीच्या आईने पती व दिराला दिली. मुलीसोबत असे कृत्य का केले यांची विचारणा करण्यास गेलेल्या पती व दीराला पप्पु बनकर, लाल्या घाडगे, संजय बनकर यांनी हाताने मारहाण केली. तसेच मुलीच्या आईली शिवीगाळ करत दमदाटी केली. यामुळे या तिघांविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.