प्रतिनिधी/ बेळगाव
गुदीगोप्प (ता. सौंदत्ती) येथील एका 16 वषीय मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे. यासंबंधी मुरगोड पोलीस स्थानकात संबंधितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
26 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी ही घटना घडली असून नागाप्पा हंची (वय 30) याच्यावर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. 16 वर्षांची मुलगी भांडी घासत होती. त्यावेळी नागाप्पाने तिचा विनयभंग केल्याचे सांगण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
हा प्रकार सुरू होता त्याचवेळी अल्पवयीन मुलीची आई तेथे आली. त्यावेळी नागाप्पाने ही गोष्ट कोणाला तरी सांगितला तर तुम्हाला सोडत नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुरगोड पोलीस पुढील तपास करीत आहेत.