प्रतिनिधी/ मेढा
जावली तालुक्यातील अत्यंत दुर्गम आणि डोंगराच्या कपारीत असणाऱया नरफदेव मेरुलिंग येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे गावातीलच देवदास तानाजी साबळे (वय 32) याने अपहरण केली असल्याची तक्रार कुटुंबीयांनी कुडाळ पोलीस स्थानकामध्ये दिली आहे. यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अपहरण केलेल्या सोळा वर्ष मुलीचा शोध पोलिसांनी अद्यापही घेतला नाही आणि तपास करून पोलिसांनी मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात सदर अल्पवयीन मुलगी दिली नाही त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या ढिसाळ कामकाजाच्या निषेधार्थ नरफदेव येथील कुटुंबीय व ग्रामस्थांनी मेढा पोलीस स्थानकाच्या समोर बुधवारी सकाळपासूनच ठिय्या मांडला होता.
यासंदर्भात कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार देवदास तानाजी साबळे हा गावातीलच युवक असून व्यवसायाने ड्रायव्हर आहे. घरात कोणीही नसताना या घटनेचा फायदा घेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
यासंदर्भात घडलेला अनुचित प्रकार कुटुंबीयांनी कुडाळ पोलीस स्थानकामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सांगितला असून देखील तक्रार दाखल करूनसुद्धा अद्याप देखील पोलिसांनी कोणतीच चौकशी अथवा या संदर्भात माहिती कुटुंबियांना दिली नसली असल्याची संतप्तजनक प्रतिक्रिया सोळा वर्षे अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी संबधित युवकाला पोलीस स्टेशनला हजर करुन घ्यावे व अल्पवयीन मुलीला संबंधित पालकांकडे सुपूर्त करावे. जिल्हा पोलीस प्रमुख यांनी या प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष घालून पिडीत मुलीला व तिच्या आई वडिलाना न्याय मिळवून द्यावा. अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा बसला नाही तर भविष्यात डोंगरमाथ्यावर शिक्षण घेणाऱया मुलींना उद्या शाळेत पाठवणार नाहीत याबाबत प्रशासनाने गंभीर दखल घेतली नाही तर मेरूलिंगचे सर्व ग्रामस्थ महिला व युवक आंदोलनाची तीव्र दिशा वाढवतील. जोपर्यंत संबधित युवक आढळून येत नाही तोपर्यंत त्याच्या आईवडिलांना दररोज पोलीस स्टेशनला हजर करून त्यांना सहआरोपी करण्यात यावी.