सातारा / प्रतिनिधी :
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी आकाशवाणी झोपडपट्टीतील युवकावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोन्या पवार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील एका अल्पवयीन मुलगी दि. 9 रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. तेथून ती कोणास काही न सांगता निघून गेली असून, तिला सोन्या पवार यानेच फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीवरून सोन्या पवार याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप त्यास अटक करण्यात आली नव्हती. पोलीस उपनिरीक्षक मुल्ला हे तपास करत आहेत.