मालवण / प्रतिनिधी-
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार मालवण पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर यासंबंधी मालवण पोलिसांनी तपास केला असता मुलीस आरोपीने पळवून नेल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी आरोपी ओंकार विजय भावे (वय 29 राहणार कळसुली ता. कणकवली) याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे कोर्टात हजर केल्यावर तीन दिवसाची पोलिस कस्टडी मागितली. मात्र मे. न्यायालयाने पोलिस कस्टडी मागणी फेटाळून न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर आरोपीतर्फे दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणीअंती मे. न्यायालयाने आरोपीची पंधरा हजाराच्या जामीनावर मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. स्वरुप पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.