ऑनलाईन टीम / सातारा :
साताऱ्याच्या वाई तालुक्यातील सुरूर येथे स्मशानभूमीत एका अल्पवयीन मुलीला पुजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीचे नातेवाईक आणि मांत्रिक फरार झाला आहे.
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास सुरूर येथील एका स्मशानभूमीत अघोरी प्रकारातून अल्पवयीन मुलीच्या मांडीवर कोंबडा ठेवून तिला पुजण्यात आले. यावेळी मुलीचे नातेवाईकही येथे उपस्थित होते. स्थानिक तरुणांकडून या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुलीचे नातेवाईक आणि मांत्रिक गायब झाला आहे. पुण्यातील हडपसर येथून एका इर्टीगा गाडीतून हे लोक आल्याची माहिती मिळत आहे.