कणकवली :
लग्नाच्या अमिषाने 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत घडल्याचे मुलीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार, पीडित मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधून या युवकाने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हाच प्रकार त्याने फेब्रुवारी महिन्यातही केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखायला लागले. कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील तपासणीत ती गरोदर असल्याने निष्पन्न झाले. मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या फिर्यादीनुसार युवकावर भादंवि कलम 376 तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार 2012 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तपास सुरू असल्याच्या कारणास्तव पोलिसांनी युवकाचे नाव सांगण्यास नकार दिला.