प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या चंपक मैदान येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱयाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आह़े ऋषीकेश दगडू तळेकर (20, ऱा उद्यमनगर, रत्नागिरी) असे या संशयिताचे नाव आह़े शुक्रवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जून रोजी 15 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याचा आरोप त्रृुषिकेश तळेकर याच्यावर ठेवण्यात आला आह़े पिडीत मुलगी ही शहरातील खासगी डॉक्टरकडे कामाला जात़े मंगळवारी सायंकाळी कामावरुन सुल्यानंतर एकटी चालत घरी जात होत़ी यावेळी तिच्यावर नजर ठेवून असलेल्या तळेकर याने दुचाकीवरून तिला गोडबोले स्टॉप येथे गाठल़े
पिडीत मुलीला दुचाकीवर बसण्यासाठी सांगितल़े यावेळी पिडीतेने दुचाकीवर बसण्यास नकार दिल़ा मात्र ऋषीकेश याने आग्रह धरल्याने पिडीता दुचाकीवर बसल़ी ऋषीकेश आपल्याला घरी सोडेल, असे या पिडीतेला वाटले होत़े यावेळी ऋषीकेश याने दुचाकी चंपक मैदानाकडे नेवून जंगलमय भागात तिच्यावर अतिप्रसंग केला होत़ा