प्रतिनिधी/ रत्नागिरी
संगमेश्वर तालुक्यातील 17 वर्षीय मुलीला पळवून नेत तिच्याशी शरीरसंबध प्रस्थापित करणाऱया तरूणाला न्यायालयाने दोषी मानून शिक्षा ठोठावल़ी सतीश उर्फ बाळा दत्तात्रय इखे (24, नेवास ज़ि अहमदनगर) असे या तरूणाचे नाव आह़े त्याला न्यायालयाने 10 वर्ष सश्रम कारावास व 12 हजार रूपयांचा दंड अशी शिक्षा सुनावल़ी
अतिरिक्त सत्र न्यायाधीश (पॉक्सो) व्ह़ी ए़ राऊत यांनी 3 ऑगस्ट रोजी खटल्याचा निकाल दिल़ा सरकारी पक्षाच्यावतीने ऍड़ मेघना नलावडे यांनी काम पाहिल़े दोषारोपपत्रानुसार आरोपी सतीश व पीडित तरूणी हे संगमेश्वर येथे बांधकामाच्या ठिकाणी एकत्र कामाला होत़े येथे त्यांच्यात मैत्री झाली होत़ी सतीश याने 15 जून 2018 रोजी संगमेश्वर येथील पीडित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल़े पीडित तरूणी घरामधून बेपत्ता झाल्याचे समजताच तिच्या वडिलांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी 6 महिन्यांपर्यत दोघांचाही थांगपत्ता पोलिसांना लागला नाह़ी अखेर पोलीस तपासात सतीश याने पीडित मुलीला औरंगाबाद येथे नेल्याचे समोर आल़े 13 डिसेंबर 2018 रोजी संगमेश्वर पोलिसांनी औरंगाबाद येथील मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनसमोरील झोपडपट्टीमधून सतीश ताब्यात घेतल़े तसेच पीडित मुलीची सुटका केल़ी
पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, सतीश याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखून औरंगाबाद येथे आणल़े या ठिकाणी गळय़ात मंगळसूत्र घालून लग्न झाल्याचे सांगून फसवणूक केला व आपल्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले, अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांजवळ दिल़ी त्यानुसार पोलिसांनी सतीश याच्याविरूद्ध भादंवि कलम 363, 376 (2)(जे) सह बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 5 (जे) 5 व 6 नुसार गुन्हा दाखल केल़ा गुह्याचा तपास संगमेश्वर पोलीस ठाण्योच पोलीस निरीक्षक उदय झावरे व पोलीस उपनिरीक्षक प्राची पवार यांनी केल़ा तसेच सतीशविरूद्ध न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े
खटल्यादरम्यान सरकारी पक्षाच्यावतीने एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आल़े कोरोना निर्बंधांमुळे खटल्यादरम्यान व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे काही साक्षी नोंदवण्यात आल्या. न्यायालयापुढे ठेवलेल्या साक्षी-पुराव्यांच्या आधारे सतीश याला दोषी मानून शिक्षा सुनावण्यात आल़ी खटल्यादरम्यान पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक दनाने व पोलीस हेडकॉन्स्टेबल वाकरे यांनी काम पाहिल़े