बेळगाव :
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातील संशयित युवकाची राज्य उच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. याबाबतचा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दि. 9 जानेवारी रोजी दिला आहे.
यासंदर्भात अनगोळ येथील रहिवासी असणाऱया शशिधर दिलीपकुमार झेरे याने राज्य उच्च न्यायालयात धाव घेऊन राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात दावा दाखल केला होता. त्या दाव्यामधील न्यायालयीन प्रक्रिया पूर्तीनंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सदर तक्रारीसंदर्भातील सत्यतेची पडताळणी केली. त्यावेळी पोलिसात केलेल्या तक्रारीतील तपशील आणि वस्तुस्थितीमध्ये विसंगती असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे सदर प्रकरणातील त्या मुलीने दिलेल्या जबानीच्या आधारावरून ही विसंगती सामोरी आली. उच्च न्यायालयाने यासंदर्भात सदर युवकाला सशर्त जामीन मंजूर केला आहे..