कराड न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी / कराड
अल्पवयीन मुलीस फूस लावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकास तीन वर्षे सक्तमजुरी शंभर रूपये व दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांनी सुनावली. नवनाथ कमलेश्वर क्षेत्री (रा. संजयनगर, मसूर ता. कराड, मुळ रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ओळखीतील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून ओळखीच्या महिलेच्या घरी ठेवले होते. त्या महिलेच्या घरी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. कराड पोलिसांनी या गुह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर सुरू होती. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी तीन महत्त्वपूर्ण साक्षीदार तपासले. पीडित मुलीचा जबाब व सत्यता न्यायालयाने तपासली. न्यायालयाने सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व शंभर रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला पोलीस गोविंद माने, हवालदार मदने, हवालदार कार्वेकर यांनी सहकार्य केले.