प्रतिनिधी / कडेगाव
कडेगाव तालुक्यातील शिवाजीनगर येथील लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार केलेल्या नराधमांना कठोर कलमे लावून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी कडेगाव शहरातील महिलांनी तहसिलदार डॉ. शैलजा पाटील व पोलिस निरीक्षक विपिन हसबनिस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
क्राईम कमी असणार्या तालुक्यात लॉकडाऊन काळात मात्र तीन घटना तालुक्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. देवराष्ट्रे परिसरात एकतफी प्रेमातून घडलेली घटना, अनैतिक संबंधातून एकाचा खून अशा घटना ताज्या असतानाच शिवाजीनगर येथे मोलमजूरी करणाऱ्या सामान्य कुटुंबातील घरातील एका बारा वर्षाच्या मुलीवर खाऊचे आमिष तसेच घरातील लोकांच्या ठार मारणाची धमकी देऊन गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या या वयस्कर दोन भावांनी वारंवार बलात्कार केला. समाजातील अशा नराधमांना फाशीचीच शिक्षा दयावी. अशी मागणी कडेगाव शहरातील महिला संघटनांनी तहसिलदार डॉ. शैलजा पाटील व पोलीस निरीक्षक विपिन हसबनिस यांच्याकडे केली आहे.
यावेळी नगरसेविका आश्विनी परदेशी, शांता घाडगे, संजीवनी डांगे, कविता जरग, शुभांगी देशमुख, सुलोचना मोरे, राजश्री पतंगे, पुजा माळी, चिमाबाई जाधव, रूपाली घाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.