कुडाळ / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय मुलाने घराशेजारी राहणाऱ्या 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनी आशिष कांबळे यांच्यासह वाईच्या डीवायएसपी शितल जानवे यांनी रात्री उशिरा तात्काळ घटनास्थळी भेट देत संबंधित मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
संबंधित अल्पवयीन मुलावर पॉक्सोअंतर्गत 410 नुसार 377 कलमनुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती. संबंधित अल्पवयीन मुलाची आज सातारा येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहितीही समोर येत आहे.