प्रतिनिधी/सातारा
सातारा येथून एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील एकावर आणि अन्य एकजण असा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
निखिल जगदाळे आणि इस्माईल असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून ते फरार झाल्यामुळे दोघांनाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्तीने तक्रार दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा येथे सामाजिक कार्यकर्ती असणाऱया एका महिलेच्या अल्पवयीन भाचीला निखिल जगदाळे (पूर्ण नाव माहित नाही. रा. कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि इस्माईल (पूर्ण नाव आणि पत्ता माहित नाही) या दोघांनी फूस लावून पळवून नेले.
ही घटना लक्षात येताच संबंधित सामाजिक कार्यकर्तीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोघांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही फरार असल्यामुळे त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर करत आहेत.