प्रतिनिधी/ सातारा
शहरालगतच्या एका उपनगरातील महिला, तिचा दीर आणि मुलगी सातारा तालुक्यातील जैतापूर येथे चिंचा झाडण्यासाठी गेले होते. चिंचा झाडत असताना चार जणांनी तिघांना जबर मारहाण करुन अल्पवयीन युवतींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन चौघांनी केल्या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. किशोर पवार, मिनाक्षी पवार, आश्रग पवार, अधीक्षक पवार गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी महिला ही मजूरी करत असून ती सातारा शहरालगत असणाया एका उपनगरात राहते. शुक्रवार, दि. 12 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ती स्वतः, तिची मुलगी आणि दीर असे तिघेजण एका गावच्या हद्दीत चिंचा तोडण्यासाठी गेले होते. ते चिंचा झाडत असतानाच सातारा तालुक्यातील एकाच गावात राहणाया किशोर रमेश पवार, मीनाक्षी किशोर पवार, आश्रग रंज्या पवार, अधीक्षक पितांबर शिंदे या चौघांनी फिर्यादी महिलेला लाथाबुक्क्या आणि काठीने मारहाण करुन शिवीगाळ करत दमदाटी केली. दीराला हात आणि लाथाबुक्क्याने मारहाण करुन जखमी केले. यानंतर फिर्यादी महिलेच्या मुलीस दगडाने मारहाण करुन तिचे कपडे फाडून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर फिर्यादी महिलेने शुक्रवारी रात्री पावणेसात वाजण्याच्या सुमारास सातारा तालुका पोलीस ठाण्यात येवून त्या चौघांच्याविरोधात तक्रार दिली आणि घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी याप्रकरणी चौघांवर विनयभंगासह पोस्कोचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव करत आहेत.