जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची सूचना : त्रैमासिक बैठकीत चर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
अल्पसंख्याकांसाठी केंद्र सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे असून अधिकाऱयांनी अल्पसंख्याकांपर्यंत सर्व योजना पोहोचवाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी अधिकाऱयांना केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक समुदाय संदर्भात त्रैमासिक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ही सूचना केली आहे.
अल्पसंख्याकांसाठी कृषी बँकांमधून 10 लाख रुपये कृषीकर्ज केवळ 3 टक्के व्याजदाराने देण्यात येते. याचबरोबर डीसीसी बँकेतून बिनव्याजी 3 लाख रुपये देण्यात येतात. ते कर्ज अल्पसंख्याकांना देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री 15 टक्के योजनेंतर्गत हे कर्ज दिले जाते. तेंव्हा अल्पसंख्याकांपर्यंत हे कर्ज पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर इतर योजनाही तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात, असेही जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले. यावेळी मनपा उपायुक्त शबीर घंटी, अल्पसंख्याक अधिकारी गोपाळ लमाणी, जि. पं. सदस्य अब्दुल बागेवाडी व अधिकारी उपस्थित होते.