न्यूयॉर्कमधील धक्कादायक प्रकार
कोरोना महामारीने सर्वाधिक नुकसान अमेरिकेतच घडवून आणले आहे. हे संकट रोखण्यासाठी तेथे दोन लसींचा वापर करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात काही विशेष पात्रता असलेल्या लोकांनाच लस देण्यात येत आहे. यात आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक सामील आहेत. परंतु न्यूयॉर्क प्रांतात विचित्र स्थिती उद्भवली आहे. तेथे लस घेण्यासाठी कमी लोक समोर येत असल्याने अनेक डोस खराब होत आहेत. हे खराब झालेले डोस फेकून द्यावे लागत आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी प्रांतात सलग दुसऱया दिवशी लसीकरणाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
प्रंटलाइन आरोग्य कर्मचारी नसलेल्या कर्मचाऱयांनाही लस देण्याची मुभा आता आरोग्य सेवा संस्थांना देण्यात आली आहे. यात औषध दुकानांमधील केमिस्ट, रुग्णालय किंवा औषध दुकानाचा कॅशियरही सामील आहे. यापूर्वी नियमांमध्ये सूट देत अत्यावश्यक कर्मचाऱयांची कक्षा वाढवून यात शिक्षकांनाही सामील करण्यात आले होते. यापूर्वी लसीकरण मोहिमेत प्राधान्यक्रमात नसलेले लोकही सामील झाल्याचे आढळून आले होते.