वृत्तसंस्था/ बर्लीन
जर्मनीच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत आघाडीवर असलेल्या बायर्न म्युनिच क्लबने कॅनडाचा फुटबॉलपटू अल्फोन्सो डेव्हिस बरोबरच्या करारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
बायर्न म्युनिच संघाने 19 वर्षीय डेव्हिस बरोबर 2025 सालापर्यंत नवा करार केला आहे. जर्मनीतील बुंदेस लीग फुटबॉल स्पर्धेत बायर्न म्युनिच क्लबने जेतेपद मिळविले असून या क्लबमध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू थॉमस मुल्लेरचा समावेश आहे. या क्लबला फ्लिक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. मुल्लेर आणि फ्लिक यांच्याबरोबरच्या करारात बायर्न म्युनिचने 2023 जूनपर्यंत वाढ यापूर्वीच केली आहे.