प्रतिनिधी /बेळगाव
अल्-मतीन एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने वैभवनगर परिसरातील रहिवाशांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके तसेच ताज शेख अल्पसंख्याकचे चेअरमन आणि अल-मतीन ट्रस्टचे सदस्य मुख्तार पठाण उपस्थित होते. त्याचप्रमाणे कमिटीचे सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.