ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरा येथील जंगलात हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा छुपा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे यासंदर्भात माहिती दिली.
अवंतीपोराच्या सीर / पस्तोना येथील जंगलात काही दहशतवादी लपल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी 42 पीआर आणि 180 बीएन सीआरपीएफ पथकासोबत शोधमोहिम हाती घेतली. दरम्यान, सीर / पस्तोना येथील जंगलात त्यांना बंदी असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा अड्डा आढळून आला. पोलिसांनी हा अड्डा उध्वस्त करत तेथील भांडी, खाद्यपदार्थांसह काही साहित्य जप्त केले आहे. 5×7 फूट आकाराचा हा दहशतवाद्यांचा अड्डा होता.