ऑनलाईन टीम / श्रीनगर :
दक्षिण काश्मीरमधील अवंतीपोरा परिसरातून अल-बदर संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी आज अटक केली आहे. दहशतवाद्यांकडून 1 स्कुटर आणि 6 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.
उल हसन आणि मुस्तक अहमद मीर अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
अवंतीपोरा पोलीस आणि सुरक्षा दलांना या दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. या दहशतवाद्यांना स्कुटीवरून शोपियानहून ख्रीऊ येथे जात असताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून अल-बदर संघटनेशी संबंधित साहित्य, एक स्कुुुटर आणि संघटनेच्या दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी आणलेले सहा लाख रुपये जप्त करण्यात आले.