वार्ताहर/ संगमेश्वर
फुणगूस खाडीभागाला अवकाळी पावसाने झोडपल्याने मोठया प्रमाणात पडझड झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गावातील घरांची,वीजेचे खांब आणि झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात सरंद नंतर खाडीभागातील देण,कोडय़े आदि गावांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला असून विद्युतखांब पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक वादळी वाऱयासह आलेल्या अवकाळी पावसाने फुणगूस खाडीभागाला चांगलेच झोडपले. वादळी वाऱयामुळे देण गावातील आठ विजेचे खांब कोसळून विजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. देण धनगरवाडया येथील रमाकांत देसाई यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने 3हजार पाचशे रुपयांचे नुकसान,,प्रकाश कोकरे 1हजार 510 रुपयांचे नुकसान, सखाराम जानू भोजे 1हजार 225, बबन कोडिंबा भोजे,दत्ताराम बाबाजी भोजे यांच्या घरावरील कौले तसेच पत्रे उडून गेल्याने त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
देण मालपवाडी येथील रामचंद्र बाबाजी मालप यांच्या शौचालयावर नारळाचे झाड कोसळले.कोंडये येथील उदय भोसले यांच्या घराजवळील दोन विजेचे खांब व वीज वाहिनी तुटून पडल्याने झालेल्या शॉर्टसर्किटमुळे गवताने पेट घेवून मोठे नुकसान झाले आहे. तेथील लोकांनी वेळीच आग आटोक्यात आणली. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून ग्रामसेवक मुंडे,सरपंच सुनिल धामणे, पडय़ार व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.
ढगाळ वातावरण आणि उष्यामध्ये वाढीने हैराण संगमेश्वर तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसत असताना दुसऱया बाजुला ढगाळ वातावरणामुळे उष्यात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.